महिला भगिनींनी घेतला मनमुराद आनंद,विविध स्पर्धा व उपक्रमांनी आणली रंगत
अमळनेर:- येथील न्यू प्लॉट परिसर विकास मंच ने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित केलेला नवरात्रोत्सव यंदा महिला भगिनी व युवतींसाठी महोत्सवच ठरला.महिला भगिनींसह युवतींनी संपूर्ण नऊ दिवस मनमुराद आनंद घेतला. विविध स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमांनी रंगत कार्यक्रमात रंगत आणली.
छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप,महाराणा प्रताप मित्र मंडळ,न्यू प्लॉट मित्र मंडळ,टिळक मित्र मंडळ,श्री राजे शहाजी मित्र मंडळ,जैन जागृती सेंटर आणि जैन सोशल ग्रुप या सर्वांच्या अनमोल सहकार्याने हा उत्सव आयोजित करण्यात आला होता.यादरम्यान संपूर्ण उद्यानात अतिशय सुंदर सजावट करून आकर्षक लायटिंग व नृत्य मंडप थाटण्यात आला होता.विधिवत पद्धतीने सप्तशृंगी मातेची स्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यासोबतच मुल,मुली आणि महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा,दांडीया स्पर्धा,गरबा स्पर्धा घेण्यात आल्या.एक दिवस सामाजिक प्रबोधन म्हणून आर बी पाटील यांचा सुलटी फी कार्यक्रम पार पडला.तसेच निवडणूक विभागाच्या माध्यमातून मतदान जनजागृती व मतदान नोंदणी मोहीम राबविण्यात आली,याचा अनेकांनी लाभ घेतला.तसेच दुर्गाष्टमीला 251 जोडप्यांची महाआरती अतिशय उत्साहात पार पडली.कॅबिनेट मंत्री अनिल पाटील याचे मुख्य यजमान होते.नूतन महिला मंडळ,लीनेस आदींनी गरबा स्पर्धा घेऊन आकर्षक पारितोषिके दिलीत.प्राशु ब्युटीक यांनी विविध योजनांद्वारे बक्षिसांची लयलूट केली. विजया दशमीला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
हे संपूर्ण नऊ दिवस आमच्यासाठी आनंदाची पर्वणी ठरल्याची भावना महिला भगिनींनी व्यक्त केली.सदर उत्सवासाठी अमळनेर न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे अनमोल सहकार्य लाभले तर पोलीस दल आणि होमगार्ड बांधवांनी सुरक्षेसाठी परिश्रम घेतले.यासाठी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला व नागरिकांनी परिश्रम घेतले.