
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमने केला गौरव…
अमळनेर:- नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम या संस्थेद्वारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार मारवड येथील रहिवासी व जि.प.उच्च.प्राथमिक.शाळा टाकरखेडे चे उपशिक्षक जगदीश भास्करराव पाटील यांना प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श पुरस्काराने त्यांना परिवारासह सन्मानित करण्यात आले.
धुळे येथील कांकारिया भुवन येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, आत्माराम मगन प्रधानसोq पोलीस उपअधिक्षक नाशिक, बी.बी.पाटील पोलीस निरीक्षक देवपूर धुळे, राष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रीय सल्लगार गोरख देवरे, सचिव डॉ जय बागुल, अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, डॉ ज्योती लष्करी नंदुरबार, प्रा. मंदाकिनी भामरे, सचिव ईश्वर पाटील यांची उपस्थिती लाभली. वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार परिषदेच्या वतीने देण्यात येत असतो. जगदीश पाटील यांना सन्मानीत करण्यात आल्याने गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शि.वि. अधिकारी श्रीमती सुर्वे,सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शा.व्य.समिती, ग्रा.प. टाकरखेडे आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. जगदीश पाटील यांच्या 28 वर्षाच्या सेवेत त्यांना यापूर्वीही पुरस्कार आखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ सटाणा जि. नाशिक यांच्या सौजन्याने परम पूज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक राष्ट्रीय विशेष गौरव पुरस्काराने 2023/24 ने सन्मानित करण्यात आलेले आहे.




