
अमळनेर :-आपत्कालीन सेवेत रुग्णांना मदत होऊन त्यांच्यावर लवकर उपचार व्हावेत म्हणून राज्यात १०८ रुग्णसेवा सुरू करण्यात आली.मात्र फोन करून देखील फोन उचलत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
याबाबत असे की,महेंद्र शिंपी रा.शिरूड ता.अमळनेर हे आपल्या रोजच्या कामे आटोपून रात्री साडे सात वाजेच्या सुमारास धुळे रस्त्यावर असणाऱ्या नायरा पेट्रोल पंपा समोर मोटरसायकल चालकाने त्यास मागाहून जोरदार धडक दिली त्यात तो जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच पत्रकार अमोल पाटील घटनास्थळी पोहचले.त्यांनी रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन १०८ ला फोन लावला.मात्र एक दोन नव्हे तब्बल पाच फोन लावून देखील त्यांनी फोन न उचलल्याने शेवटी गावातील तरुणांनी घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतर जाऊन रिक्षा बोलवून आणली.व रुग्णाला शहरात एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रुग्णाच्या सेवेसाठी तत्पर असे ब्रीद घेऊन रुग्णसेवा देणाऱ्या १०८ बाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी असून रुग्णाचा जीव वाचविणे महत्वाचे असतांना रुग्णसेवा देणारी १०८ फोन उचलत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.




