
अमळनेर:- जळगाव जाणाऱ्या बसमध्ये चढताना एरंडोलच्या महिलेच्या हातातून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २१ रोजी दुपारी पावणे दोन वाजता अमळनेर बसस्थानकावर घडली.
प्रमिलाबाई रामलाल कुमावत वय ४० रा पदमाई पार्क एरंडोल ही महिला २१ रोजी दुपारी १:३८ वाजता अमळनेर जळगाव बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिच्या हातातून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.




