
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील ३४ वर्षीय विवाहित तरुण कोणालाही न सांगता राहत्या घरून निघून गेल्याने मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मनोज रंजन पाटील असे बेपत्ता तरुणाचे नाव असून सदर तरुण सुरत येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. पत्नी मारहाण व शिवीगाळ करते व त्याला कंटाळून मी घरी निघून आलो आहे असे त्याने आईवडिलांना सांगितले. मात्र २१ रोजी सकाळी ७ वाजता तो कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र कोणताही तपास न लागल्याने त्याच्या भावाने मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. पुढील तपास हेकॉ विनोद साळी हे करीत आहेत




