
अमळनेर:- तालुक्यातील लोण खु. व वासरे येथे गावठी दारूच्या अड्ड्यावर मारवड पोलिसांनी छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
लोण खु. येथे मिनाबाई मगन भील ( वय ४६) ही सार्वजनिक ठिकाणी गावठी दारू तयार करताना आढळून आली. त्याठिकाणी ८७५० रुपये किमतीचे २५० लिटर रसायन आढळून आले. तसेच वासरे येथे रोहिदास मोतीराम भील (वय ६७) हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. ३७५० रुपये किमतीची ७५ लिटर तयार दारू मिळून आली. नमुने घेवून दोन्ही ठिकाणच्या रसायनांचा नाश करण्यात आला. याप्रकरणी मारवड पोलिसांत दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ रेखा इशी, व हेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.