
अमळनेर:- तालुक्यातील दापोरी खु. येथील पोलिस पाटील कै.सुधाकर कोळी यांचे ऑगस्ट महिन्यात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. त्याअनुषंगाने सहकारी पोलीस पाटील यांचे अकाली निधन झाल्याने पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी व मित्र परिवाराने आपल्या यथाशक्ती प्रमाणे लोकवर्गणीतून पैसा गोळा करून त्याच्या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी निधी संकलन केला. त्यांच्या घरी जाऊन संघाचे जिल्हाध्यक्ष मा.नरेंद्र शिंदे,जिल्हा सचिव लखीचंद पाटील,धरणगांव तालुकाध्यक्ष किशोर भदाणे, तसेच अंकुश पाटील,महेश पाटील, गणेश भामरे ,महेंद्र पाटील,प्रदीप चव्हाण, भरत निकुंभ,रुंधाटी येथील सहकारी,यांनी सांत्वनपर भेट देत आर्थिक मदत सुपूर्त केली. दिवंगत पाटील यांच्यासाठी अमळनेर तालूक्यातील पोलीस पाटीलांसह आपल्या जिल्ह्यातील काही बांधवांनी त्यांना आपल्या परीने आर्थिक मदत दिली होती ती मदत त्यांच्या परिवाराला दिली तसेच मागील काळातील तीन महिन्याचे 45 हजार रुपये मानधन त्यांना काढून दिले. त्यांच्या परिवाराला भावी काळात सर्व प्रकारचे सहकार्य कायम करत राहू अशी ग्वाही दिली तसेंच त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परीवाराच्या आग्रहाखातीर पाटलांच्या नावाने वृक्ष लागवड केली. आपल्या परिवारातील पुढील अडचणी तसेच समस्या सोडवण्यासाठी पोलीस पाटील संघ नेहमी प्रयत्नशील राहील असा आशावाद जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे यांनी दिला.




