
अमळनेर:- अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी २३ ऑक्टोबर मंगळवारी ९ उमेदवारांकडून १८ नामनिर्देशन पत्र घेण्यात आले आहेत.आतापर्यंत एकूण २४ उमेदवारांकडून ५६ नामनिर्देशन पत्र घेण्यात आलेले आहेत. मात्र दोन दिवसात एक ही अर्ज दाखल होऊ शकला नाही.




