
अमळनेर : रात्री संशयित रित्या फिरून पोलिसांना चकवा देणाऱ्या धुळ्याच्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले व गुन्हा दाखल केला.
पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पुंजू कुमावत हे रात्री अमळनेर तालुक्यात गस्त घालत असताना त्यांना धुळे रोडवर दोन तरुण स्वतःचे अस्तित्व लपवताना दिसले. पोलिसांना संशय आला. विचारपूस साठी पोलीस जाऊ लागले असता दोघांनी मोटरसायकल क्रमांक एम एच ४१ , बीएम ३९६७ वर धुळ्याकडे पळ काढला. कुमावत यांनी पाठलाग सुरू केला. दोघं मोटरसायकलस्वारांनी रस्त्यातून यु टर्न केला. ते परत अमळनेर कडे आले तहसील कार्यालयाजवळ पुन्हा यु टर्न घेऊन परत धुळ्याकडे जात असताना रामकृष्ण कुमावत यांनी त्यांना पकडले. त्यांची नावे रितेश संजय देवरे वय २१ मोचीवाडा मोगलाई साक्री रोड धुळे , वैभव प्रकाश म्हस्के वय २४ रा नकाणे ता जि धुळे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना अटक केली तेव्हा त्यांच्याजवळ कडी कोंडा कापणारी कटर पट्टी , नट बोल्ट उघडण्याचा पाना असे साहित्य आढळून आले. दोघे तरुण घरफोडी व चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याचा संशय व्यक्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.




