
अमळनेर : कोर्टात फारकतीच्या तारखेसाठी आलेली विवाहिता आपल्या लहान मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना ग्लोबल शाळेजवळ घडली.
तालुक्यातील पाडसे येथील एक २२ वर्षीय विवाहित तरुणी आपली लहान अडीच वर्षाची लहान मुलगी घेऊन अमळनेर कोर्टात फारकतीच्या तारखेला जाऊन येते म्हणून घरून निघाली. मुलीच्या वडिलांनी साडे अकरा वाजेच्या सुमारास अमळनेर कोर्टात तपास केला तर विवाहित दिसून आली नाही. मुलीच्या वडिलांनी रिक्षाचालकला फोन करून विचारले असता त्यांनी दोघांना ग्लोबल शाळेजवळ सोडल्याचे सांगितले. मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल नाना पवार करीत आहेत.




