
अमळनेर : २५ रोजी एकही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही मात्र ऍड ललिता पाटील यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. सात उमेदवारांनी १४ अर्ज घेतले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. २५ रोजी ऍड ललिता पाटील, डॉ जितेंद्र पाटील , संगीता पाटील कळमसरे, राजेश सुभाष पाटील अंतुर्ली,निंबा धुडकू पाटील वासरे पंकज विजय मोरे शहापूर, जयेश ज्ञानेश्वर सोमवंशी ढेकू रोड यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. आतापर्यंत फक्त अनिल पाटील आणि शिवाजी पाटील यांचेच अर्ज दाखल झाले आहेत. २८ रोजी शिरीष चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.




