अमळनेर : तालुक्यातील चिमणपुरी येथे चार दारू भट्ट्यांवर पोलिसांनी धाड टाकत टाकत ५६ हजार ५०० रुपयांचे कच्चे पक्के नवसागर गुळ मिश्रित रसायन नष्ट केले. दोन जण फरार आणि दोन जण ताब्यात घेण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक विकास देवरे याना २५ रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास फोन आला की चिमणपुरी येथे पाझर तलावाच्या काठावर गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू आहेत. पोनि देवरे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , प्रशांत पाटील , सागर साळुंखे , जितेंद्र निकुंभे , मोनिका पाटील यांना धाड टाकण्यास पाठवले. पोलीस पोहचताच दारुच्या चार भट्ट्या आढळून आल्या. पोलिसांनी दोन भट्ट्यांवरून ५ हजार रुपयांचे , २० हजार रुपयांचे रसायन , ८०० रुपयांचे रसायन तसेच दुसऱ्या दोन भट्ट्यांवरून ५ हजार रुपयांचे गुळ मिश्रित रसायन , २५ हजार रुपयांचे कच्चे रसायन , १ हजार रुपयांची दारू , असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. पोलिसांनी भगवान लाला सूर्यवंशी , बारकू भगवान सूर्यवंशी , जगतराव भगवान सूर्यवंशी , माधवराव ओंकार सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.