
अमळनेर:- विधानसभा मतदार संघासाठी २६ रोजी ग्लोबल स्कूल मध्ये १६६६ कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रशिक्षण घेतले.

सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ६ दरम्यान दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. एकूण २२ खोल्यांमध्ये कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासाठी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वर्गात स्वतंत्र बैठक, स्वतंत्र एलईडी पडदा अशी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वर्गात दोन सेक्टर अधिकारी व तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणासाठी ३९१ मतदान केंद्राद्यक्ष , ३९७ प्रथम मतदान अधिकारी , तसेच ८७८ इतर मतदान अधिकारी असे एकूण १६६६ कर्मचारी हजर होते. १२ मतदान केंद्राध्यक्ष, ४ प्रथम मतदान अधिकारी, ३३ इतर अधिकारी असे एकूण ४९ कर्मचारी गैरहजर होते.
यावेळी प्रांताधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे , गटविकास अधिकारी रामावत , उपविभागीय अभियंता हेमंत महाजन , भागवत माळी , डी ए धनगर यांच्यासह ४४ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. त्यांना प्रशांत धमके , नितीन ढोकने , संदीप पाटील , भूषण पाटील , प्रियंका पाटील , रुपाली अडकमोल , एम पी भावसार यांचे सहकार्य लाभले.
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई…
गैरहजर कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देऊन त्यांचे प्रशिक्षण घेणार. त्यांनंतरही जर गैरहजर राहिल्यास त्यांना नोटिसा देऊन कारवाई करण्यात येईल.
–नितीन मुंडावरे ,उपविभागीय अधिकारी ,अमळनेर




