
२ कोटींचे आहेत कर्ज, दोन गुन्हे प्रलंबित…
अमळनेर:- विधानसभा मतदार संघात काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे प्रमुख उमेदवार डॉ अनिल शिंदे यांची एकूण संपत्ती ४ कोटी ८० लाख १४ हजार ११ रुपये आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर एकही वाहन नसून दोन गुन्हे प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

फक्त डॉ अनिल शिंदे यांच्या हातात रोख ४ लाख ७५ हजार रुपये आहेत. बँक , बंध पत्रे , शेअर्स व इतर रूपाने जंगम मालमत्ता १ कोटी ४६ लाख १४ हजार ११ रुपये आहे. त्यांच्याकडे एकही वाहन व एकही दागिना नाही. तर त्यांच्याकडील शेतजमीन ,प्लॉट ,बांधकाम आदी प्रकारची स्थावर मालमत्ता ३ कोटी ३४ लाख रुपये असून त्यांच्यावर एकूण २ कोटी ३ लाख ८८ हजार ३५६ रुपये कर्ज आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून डॉ अनिल शिंदे यांच्यावर ४ कोटी ८० लाख १४ हजार ११ रुपयांची संपत्ती आहे. डॉ अनिल शिंदे यांच्याविरुद्ध ऍट्रोसिटी व मरणास कारणीभूत असे दोन गुन्हे प्रलंबित आहेत.




