अमळनेर:- आर बी पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधून एक लाख ९ हजार रुपये किमतीची तांब्याची तार व ऑइल चोरीस गेल्याची घटना २७ रोजी रात्री ते २८ रोजी सकाळी देवळी शिवारात घडली.
कंपनीचे कर्मचारी सुनील शालीग्राम पाटील हे २८ रोजी सकाळी कंपनीवर गेले असता कंपनीचा ट्रान्सफॉर्मर खाली उतरवलेला दिसला. तेथील १ लाख रुपयांची तांब्याची तार आणि ९ हजार रुपये किमतीचे ऑइल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.