शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी व शेतमालाच्या हमीभावाबद्दल प्रचारादरम्यान चर्चा
अमळनेर:- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी आपल्या समर्थकांसोबत संध्याकाळी प्रभावी प्रचार दौरा करीत असून या दौऱ्यात, त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या अभावाबद्दल चर्चा केली.
डॉ. अनिल शिंदे यांनी शिरूड, कावपिंप्री, इंदापिंप्री, सुमठाणे, इधवे, जिराळी आणि पिंपळकोठा गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला. या उपस्थितीत महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते होते. त्यांनी स्पष्ट केले की, “महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेकानंतर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही.” डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वात, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थिती, बेरोजगारीच्या प्रश्नांवर चर्चा केली. या संदर्भात, त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “चांगल्या मतांनी मला निवडून द्या आणि सेवेची संधी द्या.”
परिवर्तनाचा संदेश…
“जनता बोले परिवर्तन!” हे वाक्य आता अमळनेर विधानसभा मतदारसंघात एक महत्त्वाचे सूचक ठरले असून डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वात, सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत असून, या मतदारसंघातील परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास समर्थक व्यक्त करीत आहे.
महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या दृष्टीने जोमाने कामाला लागले आहेत. अमळनेर विधानसभा मतदारसंघात डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यात शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आणि मतदारांचे समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न केले असल्याने जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून डॉ. शिंदे पुढे आल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे.