अमळनेर : धुळे रस्त्यावर दोन ठिकाणी असलेले खड्डे जणू काही अपघातास जाहीर निमंत्रण देत आहेत. अनेक मोटरसायकलींचे याठिकाणी अपघात झाले आहेत.
दगडी दरवाज्याजवळ असलेल्या नाल्यावरील खड्डा लोखंडी जाळीने झाकन्यात आला होता. मात्र जाळी तुटल्याने खड्डा उघडा पडला आहे. त्यामुळे मोटारसायकली अथवा पायी जाणारे अचानक खड्ड्यात पडतात.
त्याचप्रमाणे पाच पावली मंदिराजवळ देखील असाच एक खड्डा पडला असून तेथेही अचानक वाहने आदळतात. नागरिकांना खूप त्रास होत आहे. संबंधित विभागाने तातडीने हे खड्डे बुजवावेत अन्यथा अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही, असे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत.