अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथे अज्ञात चोरट्यानी तीन घरे फोडून सुमारे तीन लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ४ रोजी रात्री ते ५ रोजी सकाळ दरम्यान घडली.
अमोल रमेश महाजन यांनी फिर्याद दिली की ५ रोजी सकाळी ५ वाजता नळाला पाणी आले म्हणून वडील उठले असता त्यांना किचन मधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तेव्हा अमोलच्या आईने धान्याच्या कोठीत ठेवलेले तीन ग्रॅम सोने व ९८ हजार रुपये रक्कम तपासले असता ते मिळून आले नाही. आजूबाजूच्या लोकांना हे संगीतले असता त्यांनी माहिती दिली की, गावातीलच भगवान भिवंसन माळी आणि नीता संजय वाघ हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांचीही घरे फोडण्यात आली. भगवान माळी यांच्या घरातील ५० हजार रुपये रोख आणि ८ ग्रॅम सोन्याच्या बाळ्या तर नीता वाघ यांच्या घरातील ५० हजार रुपये रोख, १०० ग्रॅम चांदीचे दागिने, ५ ग्रॅम मनी मंगळसूत्र, १ ग्रॅम सोन्याची बाळी, ५ ग्रॅम सोन्याच्या रिंग, चार ग्रॅम सोन्याच्या कड्या, ३ ग्रॅम सोन्याचे डोरलं असा एकूण तिन्ही घरातील ३ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेले. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.