
अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर येथील १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मारवड पोलिसांत देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जैतपिर येथील १६ वर्ष ९ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीस ४ रोजी रात्री तिच्या आईवडिलांनी नातेवाईक आल्याने आजी आजोबांच्या घरी झोपायला पाठवले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ती परसाकडे जाऊन येते असे सांगून घरातून निघाली. मात्र बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने आई वडील व नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र कोणताही तपास न लागल्याने कोणीतरी तील फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने तिच्या आईने मारवड पोलिसांत तक्रार दिली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




