अमळनेर:- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अनिल शिंदे हे उच्चविद्याभूषित असे उमेदवार असुन उत्तर महाराष्ट्रातील एकमेव नामांकित सर्जन व गोरगरिबांची परिस्थितीची जाण असणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. खा. शरद पवार यांचे शब्द खरे ठरवत डॉ. शिंदे यांना निवडून आणणार असे उमेश पाटील यांनी सांगितले आहे.
डॉ अनिल शिंदे हे अतिशय सरळ,सोज्वळ, मनात कोणतेही डावपेच नाही असा त्यांचा स्वभाव गुण आहे. अगदी स्पष्ट बोलणे ही त्यांची ओळख आहे. मात्र जनता हि मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांना कंटाळलेली असुन मतदारांना नवीन पर्याय हवा आहे म्हणून जनता आजी व माजी दोन्ही आमदारांना नाकारणार आहे. विधानसभा मतदारसंघाची तसेच गोरगरिबांची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. डॉ अनिल शिंदे यांनी निवडणूका जाहिर होण्यापूर्वीच आधी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्यांची जाण डॉ अनिल शिंदे यांना असुन त्या सर्व समस्यावर मार्ग काढायचा असेल तर त्यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ग्रंथालय विभाग प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत शरदचंद्र पवार यांनी मंत्री अनिल पाटील हे पुन्हा निवडुन येणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असे मत व्यक्त केले होते. म्हणून आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा शब्द आम्हाला
खरा करण्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहोत, असे उमेश पाटील यांनी सांगितले आहे.