
अमळनेर : तालुक्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार स्विप कार्यक्रम राबवण्यात आला. आणि मतदान टक्केवारी वाढली म्हणून पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम यात विविध प्रकारे मार्गर्शन, पत्र लेखन, रांगोळी स्पर्धा,गृहभेटी, जनजागृती, घंटा गाडीवर मतदानास आवाहन करणारे जिंगल/गीत प्रसारण करणे, सावत्रिक ठिकाणी मतदान जनजागृती पर होडिंग / बॅनर लावणे, मॅरेथॉन स्पर्धा, बचत गटातील महिलांची केंद्रस्तरीय कार्यशाळा, गावपातळीवर होणारे विविध कार्यक्रम मध्ये शपथ घेणे. यासर्व कार्यक्रमाची आखणी व नियोजन अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर.पाटील साहेब ,गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील तसेच विशेष शिक्षक किशोर राजधर पाटील यांनी तालूक्यातील सर्व शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांकडून करून घेतले. त्याबद्दल माननीय जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याकडून प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.




