
त्रेसष्ट वर्षीय वृद्धावर पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथे त्रेसष्ट वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याबाबत मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून २२ रोजी मुलीचे आई वडील हे मजुरीसाठी शेतात गेले होते. त्यामुळे पीडिता तिच्या बहीण भाऊसह घरीच होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीडिता अंडे घेण्यासाठी दुकानात गेली असता परत येताना गावातील धुडकु बडगुजर (वय ६३) याने तिला दोन रुपयाचे आमिष दाखवत मोरीत नेले. तिचे अंतर्वस्त्र काढल्याने पीडिता घाबरून गेल्याने तिने पळ काढला. सायंकाळी पीडितेचे आई वडील घरी आल्यावर तिने त्यांना हकीकत सांगितल्याने सदर मुलीच्या आईने मारवड पोलिसांत धाव घेवून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोक्सो, अट्रोसिटीसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.




