
डॉ. अनिल शिंदेंसह दहा उमेदवारांची अनामत जप्त…
अमळनेर:- विधानसभा मतदार संघात मंत्री अनिल पाटील व शिरीष चौधरी वगळता डॉ अनिल शिंदेंसह सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महाविकास आघाडीच्या बहुतेक नेत्यांच्या गावात मंत्री अनिल पाटील यांनी आघाडी घेतली असून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांच्यापेक्षा अपक्ष शिरीष चौधरी यांना जास्त मते पडली आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी गर्दी करणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात मतदारांनी अंजन घातले आहे. कारण त्यांच्या गर्दीमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यास उशीर झाला होता.

खासदार स्मिता वाघ यांच्या डांगर गावाला अनिल पाटील यांना ६५७, शिरीष चौधरी याना ४३१ मते, माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजवड गावाला डॉ शिंदे यांना १०३ , अनिल पाटील यांना ७६३ तर चौधरी याना १९२ मते मिळाली. माजी आमदार डॉ बी एस पाटील व बाजार समिती माजी सभापती प्रफुल पाटील यांच्या मालपूर गावाला डॉ शिंदे यांना फक्त ८ , अनिल पाटील यांना २०९ तर चौधरी याना १२७ मते , काँग्रेसचे अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांच्या खवशी गावाला डॉ शिंदे यांना ७५, अनिल पाटील यांना ५४४ तर चौधरी याना १८९ मते मिळाली. शिवसेना उबाठा च्या नेत्या ऍड ललिता पाटील यांच्या बामणे गावाला डॉ शिंदे यांना ३५ , अनिल पाटील यांना ४०० तर चौधरी याना ९९ मते मिळाली. शिवसेना(उबाठा) तालुका प्रमुख श्रीकांत पाटील यांच्या मंगरूळ गावाला मंत्री अनिल पाटील यांना तालुक्यात सर्वाधिक २२१४ मते चौधरी याना ४३२ तर डॉ शिंदे यांना १३७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या रंजाणे गावाला डॉ शिंदे यांना ९० , मंत्री अनिल पाटील यांना २५२ , तर चौधरी याना ७८ मते मिळाली. काँग्रेस नेते धनगर पाटील यांच्या झाडी गावाला डॉ शिंदे यांना १५३ , अनिल पाटील यांना ६२४ तर चौधरी याना १६२ मते मिळाली. किसान काँग्रेसचे शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) च्या नेत्या तिलोत्तमा पाटील व पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे यांच्या शिरूड गावाला डॉ शिंदे यांना १४६ , अनिल पाटील यांना ११५४ तर चौधरी याना ५६८ मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या कंडारी गावाला अनिल पाटील यांना १९६ तर चौधरी यांना २६० मते मिळाली. राष्ट्रवादी (एस पी) ग्रंथालय सेल चे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या पिंपळकोठा गावाला डॉ शिंदे यांना ६५ मते ,अनिल पाटील ३३८ तर चौधरी याना ३८५ मते मिळाली.
अनिल पाटील यांना त्यांच्या गावाला १४६ तर चौधरी यांना ६५ मते मिळाली.डॉ अनिल शिंदे याना त्यांच्या पिळोदा गावाला ५०३ ,अनिल पाटील यांना ५९० तर शिरीष चौधरी याना ४२० मते मिळाली. डॉ शिंदे यांना सुंदरपट्टी व हिंगोणे खुर्द प्र अमळनेर येथे शून्य मते मिळाली आहेत. सर्वाधिक नोटा तांदळी गावाने ७० मते दिलीत. एकूण १३२९ नोटा होते. पोस्टल बॅलेट मध्ये १९४ मते रिजेक्ट झाली आहेत. तर ४ मते प्रदत्त झालीत.
अनिल पाटलांनी एकूण मतदानाच्या ५३.५% मतदान घेतले , शिरीष चौधरी यांनी ३७.१६ % मतदान घेतले. अनिल शिंदे यांनी ६.७४% मतदान घेतले. इतर उमेदवार १ % पेक्षा खाली राहिले.




