
उत्तर महाराष्ट्रातुन राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असल्याने वाढली शक्यता
अमळनेर-राज्यात मिळालेल्या स्पष्ट बहूमतामुळे महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज दिनांक 25 रोजी मुंबई येथे होणार असून यानंतर होणाऱ्या मंत्री मंडळाच्या शपथविधीत अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मंत्री अनिल भाईदास पाटलांना पुन्हा मंत्रीपदाचा ताज मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

अनिल पाटील संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातुन राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.दरम्यान राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षांचे सरकार स्थापन होणार असून ठरणाऱ्या धोरणानुसार तिन्ही पक्षांच्या आमदारांना मंत्री पदाची संधी दिली जाणार आहे.यात जळगाव जिल्ह्यातून कुणाकुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.अजित पवार गटातफे गेल्या वेळी दहा मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली होती यात विधी मंडळात दाखविलेली क्रियाशीलता आणि जळगाव जिल्ह्यातून एकमेव आमदार म्हणून अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली होती.त्यांना मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन हे खाते मिळाले होतें,मंत्री पदी असताना त्यांनी आपल्या खात्याचा कार्यभार उत्कृष्ठपणे सांभाळला.यामुळे पक्ष श्रेष्ठी त्यांच्या कामावर समाधानी असल्याचे बोलले जात आहे.
सुदैवाने अनिल पाटील पुन्हा निवडून आल्याने आणि आताही उत्तर महाराष्ट्रातून ते एकमेव अजित पवार गटाचे आमदार असल्याने पुन्हा त्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली असून यासाठी अमळनेर मतदारसंघात अनेकांनी साकडे घातले आहे.




