
अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीत २५ रोजी मालाची विक्रमी २२ हजार क्विंटल आवक झाली. मक्याला खान्देशातून सर्वाधिक २२५० रुपये भाव देण्यात आला.

गेल्या आठ दिवसापासून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १४ ते १५ हजार क्विंटल आवक होत आहे. २५ रोजी सकाळपासून धुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अमळनेर बाजार समितीत मक्याला चांगला भाव मिळत असल्याने आजूबाजूच्या तालुक्यातून मका विक्रीसाठी शेतकरी अमळनेरला आणत आहेत.
इतर बाजार समितीत २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला मात्र अमळनेर बाजार समितीत २५ रोजी २२५० रुपये क्विंटल मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला. बाजार समितीचे सचिव उन्मेष राठोड व कर्मचारी दिवसभर ट्रॅक्टर व लिलावाच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त होते.
प्रतिक्रिया
अमळनेर बाजार समितीत शिस्तीत लिलाव केला जातो. वशिलेबाजी होत नाही. रोखीने पेमेंट आणि सर्व प्रकारच्या मालाला उत्तम भाव दिला जातो म्हणून बाजार समितीत आवक वाढली आहे.- अशोक पाटील ,सभापती ,कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर
प्रतिक्रिया
अमळनेर बाजार समितीत सुमारे ३ लाख क्विंटल खरेदी झाली असून माझा एकट्याचा ४० हजार क्विंटल मका बाजार समितीच्या आवारात पडला आहे. दोन दिवसात मका उत्तरप्रदेश व पंजाब ला पाठवण्यात येणार आहे.- मितेश गोसलीया, व्यापारी अमळनेर




