
अमळनेर:- विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ना.अनिल भाईदास पाटील यांनी दणदणीत विजय मिळविल्याबद्दल अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती अशोक आधार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सभापती अशोक पाटील यांनी उपस्थित शेतकरी,व्यापारी,हमाल, मापाडी तसेच बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेढे भरवून आनंद साजरा केला.बाजार समितीतील व्यापारी संघटना, हमाल – मापाडी संघटना,कर्मचारी संघटना यांनी निवडणुकीत अनिल पाटील यांना आधीच पाठिंबा दिलेला होता.मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी १० वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद भूषविले असून, बाजार समितीच्या प्रत्येक घटकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
बाजार समितीत विजयोत्सव साजरा करतांना संचालक समाधान धनगर,वृषभ पारख,विजय पाटील तसेच व्यापारी,शेतकरी उपस्थित होते.




