अमळनेर : सध्या वातावरणात खूप विषमता निर्माण झालेली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक आरोग्यास घातक असलेल्या संख्येच्या पार झाल्याचे सानेगुरुजी शाळेचे शिक्षक डी ए धनगर यांनी सांगितले. त्यातच पारा खूप घसरला आहे. त्यामुळे प्रचंड थंडी जाणवत आहे. दहा अंश सेल्सिअसच्या जवळ तापमान असल्यामुळे अनेक प्रकारचे आजार डोके वर काढायला लागले आहेत. कमी रोगप्रतिकारक्षमता असलेले यामुळे त्रासलेले आहेत. सर्दी, पडसे, घसा खराबी, खोकला, श्वसनाचे विकार, ताप व अन्य आजारांनी उच्चांक गाठलेला आहे.
ऐन दिवाळीच्या दिवसात पर्यावरण पूर्वक दिवाळी साजरी केल्यामुळे गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात राहिला परंतु सध्या ऋतू बदल कालखंडात हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारून आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. सध्या चिंताजनक पातळीवर असलेला हवेचा निर्देशांक अति चिंताजनक पातळीवर जाणार नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हवेचे प्रदूषण होणार नाही यासाठी मदत केली पाहिजे. सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.अन्यथा अनेक प्रकारचे आजार वाढण्यास मदत होईल असे मत डी ए धनगर यांनी नोंदवले. तसेच अनेक प्रकारचे शासनाचे आजार वाढवून काही रुग्ण दगावण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात ठेवला पाहिजे. सध्या प्रचंड थंडी पडत असल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांनी तसेच कमी प्रतिकारक्षमता असलेल्या नागरिकांनी विनाकारण सकाळी लवकर घराच्या बाहेर पडू नये. व उबदार कपडे वापरावेत असे आवाहन देखील धनगर यांनी केले आहे.