अमळनेर:- दि.२८ व २९ नोव्हेंबर रोजी शहरातील सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये आंतरशालेय वकृत्व स्पर्धा आणि बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बोहरा स्कूलचे डायरेक्टर गौरव बोहरा, तसेच ग्लोबल स्कूलचे प्राचार्य लक्ष्मण सर विशेष अतिथी म्हणून लाभले होते.
तसेच या कार्यक्रमास परीक्षक म्हणून नागराज माळी, शरद पाटील सर, वसुंधरा लांडगे मॅडम, नितीन शिंगाणे सर, विवेक बडगुजर सर उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांनी सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बोहरा स्कूलमधील विद्यार्थ्यांनी तसेच अमळनेर मधील इतर शाळा मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. या वकृत्व स्पर्धेतील मोठ्या गटातून बोहरा स्कूल मधील इ.८वी.तील विद्यार्थिनी देवयानी पाटील ही प्रथम तर, लहान गटातील इ.६वी तील विद्यार्थी ओम पाटील हा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले .
तसेच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये बोहरा स्कूल मधील मधील इ.९वी तील योगेश्वर पाटील द्वितीय तर लहान गटातील इ.७वी तील विद्यार्थी दक्ष सुराणा प्रथम,व इ.७वी तील विद्यार्थिनी पलक बाविस्कर हीने द्वितीय पारितोषिक पटकावले.
कॅरम स्पर्धेमध्ये बोहरा स्कूल मधील इ.७वी तील विद्यार्थी कृषी लोढा द्वितीय पारितोषिक पटकाविले.
या कार्यक्रमासाठी शाळेची प्राचार्य जितेंद्र सिंग सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे अतिशय उत्साही वातावरणात या स्पर्धा पार पडल्या.