
अमळनेर:- शहरातील डॉ. अक्षय कुलकर्णी यांच्या मनुश्री सर्जिकल हॉस्पिटलला 25 वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 25 ते 30 नोव्हेंबर 24 दरम्यान कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला. यात त्यांनी रुग्णांना माफक दरात आरोग्य सेवा देऊन ‘समाज ऋणातून ‘अंशतः उत्तराई होण्याचा प्रयत्न केला.

यात त्यांनी मोफत रुग्ण तपासणी व गरजू रुग्णांना अतिशय माफक दरात सोनोग्राफी, एक्स-रे, गॅस्ट्रोस्कोपी, ब्लड शुगर यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. ज्याला अमळनेर शहर व तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला.
डॉक्टर अक्षय यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये झाले. त्यामुळे शिस्तबद्ध जीवन पद्धती व देश, समाजाप्रती कर्तव्य ही त्यांची जीवनशैली बनली. त्यांचे एमबीबीएस, एम एस, डी एन बी चे शिक्षण ग्रैंड मेडिकल कॉलेज व सर जेजे हॉस्पिटल मुंबई येथून झाले.
1999 मध्ये अंमळनेर येथे त्यांनी स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले. अमळनेर आपली कर्मभूमी मानली. आपल्या प्रॅक्टिसमध्ये नैतिकता व वैद्यकीय पेशाची पवित्रता अखंड जपत येथील लोकांना आधुनिक सर्जिकल उपचार येथेच उपलब्ध करून दिले. हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, भगंदर यासारख्या जनरल सर्जरी बरोबर पित्ताशय, किडनी स्टोन आतड्याच्या गाठी, थायरॉईड डायबिटीसच्या जखमा व स्क्रीन ग्राफ्टिंग, स्तनाचा कॅन्सर यासारख्या मोठ्या गुंतागुंतीच्या व इमर्जन्सी सर्जरी यशस्वीरित्या केल्यात. 2002 साली अमळनेर तालुक्यात प्रथमच लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुरू केली. हजारो रुग्णांना दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा फायदा मिळाला.
2009 साली आपल्या निदानात अधिक अचूकता येण्यासाठी सोनोग्राफीची सरकारी परीक्षा देऊन सरकार मान्य सर्जिकल सोनोग्राफी सेंटर सुरू केले. तर 2014 मध्ये गेस्ट्रोस्कोपीचे प्रशिक्षण घेऊन गेस्ट्रोस्कोपी सेंटर सुरू केले. ज्यामुळे अन्ननलिका व जठरांमधील अल्सर, कॅन्सर याचे निदान लवकर होऊन पेशंटचे आयुष्य वाचवण्यासाठी त्याचा उपयोग झाला.2023 सालापासून अत्याधुनिक जर्मन लेझर मशीनच्या सहाय्याने पाइल्स, भगंदर, फिशरचे ऑपरेशन सुरू केले. दर शुक्रवारी डॉ. धुळे येथील जवाहर मेडिकल कॉलेजमध्ये जातात. येथील अनेक गरीब रुग्णांचे त्यांनी तिथेही ऑपरेशन केली.अमळनेरकरांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला, प्रोत्साहन दिले त्या सर्व शुभचिंतकांविषयी डॉ.नी कृतज्ञता व्यक्त केली.




