
श्री गणेश लॅबचे सुनील पाटील यांनी शेअर केला ओटीतील थरारक अनुभव
अमळनेर:- रात्री खेळताना पडून जखमी झालेल्या अवघ्या बारा वर्षाच्या मुलाची तातडीने शस्रक्रिया करताना सहकाऱ्यांनी सोडलेला धीर, आणि कमजोर करणाऱ्या आत्मविश्वासावर मात करीत वेळप्रसंगी कठोर भूमिका घेत मृत्युच्या दाढेतून त्या मुलाला बाहेर काढत जीवदान देणारे डॉ. अक्षय कुलकर्णी यांच्यातील निष्णात सर्जनचा अनुभव अतुलनीय असल्याचे श्री गणेश लॅबचे सुनील पंडितराव पाटील सांगतात.

डॉ. अक्षय कुलकर्णी यांनी “कृतज्ञता सप्ताह साजरा केल्याने त्यांच्याशी जुडलेले सुनील पाटील यांनी भावुक होत आपला अनुभव त्यांना शेअर केला आहे.. ते म्हणतात, सर, खर तर आपण या वैद्यकीय क्षेत्रात जी अहोरात्र एक “निष्णात सर्जन “म्हणून सेवा देत आहात ते पहाता आम्ही अमळनेरकरांनीच आपले आभार मानून आपल्या प्रति सदभावना व्यक्त केली पाहिजे. पण तसे न घडत्ता आपण आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षात देत आहात यावरून आपले वैद्यकीय क्षेत्रातील योगदान खरोखरच अतुलनीय असेच आहे. आपल्या सोबतच मी ही
पॅरावैद्यकीय व्यवसायात 1995 पासून” लॅब तंत्रज्ञ” म्हणून या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. तर मी या ठिकाणी मी आपल्या सोबत काम करीत असताना जे मला आवडले ते म्हणजे असा एक आत्मविश्वासाने परिपूर्ण भरलेला असा सर्जन पाहिला व जवळून अनुभवलाही आहे… आणि अभिमानाने सांगू इच्छितो थोड्या प्रमाणात मी सुध्दा त्या सर्जरीचा एक छोटासा भाग आहे. असाच एक आपल्या सोबतचा ओ.टी. मधील अनुभव मला आपल्या या “कृतज्ञता सप्ताह “निमित्ताने आपल्याशी शेअर करायला निश्चितच आवडेल.
मला आजही आठवतंय आपल्या स्वतःच्या हॉस्पिटलची सुरुवात ही जुन्या स्टेट बँकेच्या जागी, म्हणजे हल्लीची सेन्ट्रल बैंक समोर अक्षय तृतीयेला संत सखाराम महाराज यांच्या आशीर्वादान झाली आणि तेथूनच आपला सर्जरीतील विजयरथ मार्गक्रमण करू लागला.
असाच एक प्रसंग मला आजही लक्षात आहे. वेळ रात्री 11 वाजेची होती.. आपला फोन आला. सुनील ताबडतोब ये एक इमर्जन्सी केस आहे. लवकर इन्वेस्टीगेशनची आवश्यकता आहे. कारण ही तसंच होते एका 12 वर्ष वय असलेल्या व ज्याच की स्प्लेनिक झाले होते. त्याचा रात्री खेडी रामेश्वर या खेड्यात खेळताना रात्री अपघात होऊन तो पोटावर पडून ती फुटली होती. त्यानी त्या अवस्थेत त्याला आपल्या मनुश्री हॉस्पिटलमध्ये आणलं होतं, आव्हानात्मकच होते ते. पण आपण क्षणाचाही विलंब न करता किंवा पैशाची अडवून न करता त्याची शस्त्रक्रिया सुरू केली. खूपच मोठी शस्त्रक्रिया आणि तेव्हढीच धोकादायकही होती. त्या बालरुग्णासाठी. पण आपण तीला सुरुवात केली. तश्यातच माझा रक्ताचा अहवाल तयार करून मी हॉस्पिटलमध्ये आलो. तो पाहून आपण मला त्या दिवशी थोडे थांबण्यास सांगितले. आपल्या सूचनेनुसार व वेळेचं गांभीर्य पाहता मग मी ही थांबलो… ओ. टी तील आपले सर्जरीचे स्किल मला त्या निमित्ताने बघायला मिळाले होते.
ओपेरशन सुरू होऊन साधारण पणे 20 ते 25 मिनिटे झाली होती आणि अश्यातच भुलतज्ञ डॉ. बी. ओ. पाटील आपल्या कार्डीक मॉनिटरवर बघून आपल्याकडे गंभीर मुद्रेने पहात असतानाच आपल्याला असिस्ट करणारे डॉ. नवसारीकर हे आपणास तो बालक हैपो्टेंशनमध्ये जातोय अक्षय आता काय करायचे, त्याचे काही खरं नाही, बघ पल्स रेट पण खाली येतोय, तू आता नातेवाईक यांना तो वाचणार नाही अस जाहीर कर लवकर असे नकळतपणे मानसिक दडपण आणत होते. पण नाही आपल्या जवळ एक जबरदस्त आत्मविश्वास आणि मी याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढेलच ही प्रबळ इच्छा शक्ती ही होती सर… जी की आपणास माघार घ्यायला परवानगी देत नव्हती. आपण त्या दोघांवर चिडत,” तुम्ही फक्त तुमचं काम करा” त्या मॉनिटर कडे बघू नका, आणि आजपर्यंत माझ्या ऑपरेशन टेबलावर सर्जरी करताना कुणालाही मृत्यू आलेला नाही, अशी डॉ. नवसारीकर यांना संतापातच सूचना दिली… आणि लगेचच आपण सरांना त्याच्यासाठी एक इमर्जन्सी ड्रग (ज्याचे की नाव मला आठवत नाही) तो देण्यास सांगितला. आणि काय दैवी चमत्कार म्हणावा त्याचे हृदयाचे ठोके, रक्तदाब सर्व पूर्ववत सुरू झाले जे की एका क्षणाला पूर्ण खाली आले होते. मग डॉ. बी. ओ. पाटील सरांची ही उमेद वाढली आणि ते माझ्या कडे बघत म्हणाले की सुनील तुम्ही याला एखादी फ्रेश रक्ताची बॅग मॅनेज करून दिली ना तर हा लवकर रिकव्हर होईल. कारण त्याचे त्या अपघातात बरच रक्त वाहून गेले होते. मी ही बॉम्बे हॉस्पिटलच्या रक्तपेढीला 3 महिने प्रशिक्षण घेतलं असल्याने मला आत्मविश्वास होताच, पण हे असे लावणे गैर आहे सर ते ब्लड बँकेच काम आहे आपण कस हातात घ्याव तो गुन्हा आहे, असे मी आपणास सांगताच (कारण तेव्हा धुळे येथून बॅग आणाव्या लागत होत्या आणि वेळ रात्री 1 ची होती.) सर आपण मला समजवत हे बघ सुनील मला माहित आहे, तू अस काम करीत नाही, पण तू केलं तर हे एक बालकाला दिलेलं जीवनदान असेल सांगत मला तयार केले. माझ्या आयुष्यातील मी एका चांगल्या कार्यासाठी केलेलं पहिल रक्तसंक्रमन होते ते….
ती बॅग लावून झाल्यावर मग आपण चहापानासाठी रेल्वे स्थानकावर गेलो. आपण रात्री 2 वाजेला परत आल्यावर ते बालक बऱ्यापैकी स्थिरावले होते अर्थातच धोक्याच्या बाहेर होते. हा प्रसंग मला आपणा मुळेच अनुभवायला मिळाला. ज्यात की खारीचा वाटा मला आपल्या आत्मविश्वासाने परिपूर्ण भरलेल्या अश्या सर्जरीमुळे मिळाला, धन्यवाद सर त्या निमित्ताने मी आपल्या कृतज्ञता पूर्वक रौप्य महोत्सवी सप्ताहात आपला सदैव ऋणी राहू इच्छितो. देवी धन्वंतरीची आपल्या वर सदैव कृपादृष्टी रहावी आणि आपणा हातून अश्याच आत्मविश्वासाने मोठ मोठ्या सर्जरी होवोत अशी शुभेच्छा ही सुनील पाटील यांनी दिली आहे.




