
अमळनेर : धावत्या रेल्वे खाली एक ३५ ते ४० वर्षाचा इसम कापला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी सकाळी पावणे सहा वाजेपुर्वी घडली.

अमळनेर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांनी अमळनेर पोलिस स्टेशन ला खबर दिली की अमळनेर टाकरखेडा दरम्यान खांबा क्रमांक २५४/२२-२४ दरम्यान एक ३५-४० वर्षाचा अनोळखी इसम पहाटे रेल्वेखाली कापला गेला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अमळनेर पो स्टे ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.




