अमळनेर-जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 15 डिसेंबर ( पंधरवाडा) निमित्त खुली रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा अमळनेर येथे दि.8 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ग्रामीण रुग्णालय ICTC सेंटर अमळनेर,आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर, रोटरी क्लब ऑफ अमळनेर
यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एच आय व्ही एड्स दिन सप्ताह अभिया राबविण्यात येत आहे.त्यानिमित्ताने ही स्पर्धा होत आहे.8 डिसेंबर रोजी रोटरी हॉल , पी बी ए इंग्रजी शाळा येथे सकाळी 11 वाजता रांगोळी स्पर्धा व पोस्टर मेकिंग स्पर्धा होणार आहे.वय 18 ते 30 दरम्यानच्या स्पर्धकांसाठी ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही स्पर्धा साठी रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.प्रत्यक्ष सहभागींनाही प्रमाणपत्र देण्यात येईल.रांगोळी स्पर्धेसाठी सहभागींनी त्यांचे स्वतःचे रांगोळी कलर आणायचे असून पोस्टर मेकिंग साठी आयोजकांकडून कार्डशिट देण्यात येणार आहे.स्पर्धकांनी आपले अर्ज दिनांक 5 आणि 6 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय अमळनेर ,ICTC सेंटर खोली नंबर 17 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारले जातील.अधिक माहितीसाठी अश्वमेघ पाटील 9764461228, राकेश महाजन 9960509619 यांचेशी संपर्क साधावा.




