
तर व्हॉईस चेअरमनपदी रमेश सैंदाणे यांची बिनविरोध निवड…
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध पार पडली असून चेअरमनपदी शशिकांत सखाराम पाटील, व्हॉईस चेअरमनपदी रमेश दगडु सैंदाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून एस. पी. महाजन यांनी काम पाहिले. त्यांना सेक्रेटरी भावसार आप्पा यांचे सहकार्य लाभले. यावेळी संचालक तुळशीराम पाटील, दिलीप पाटिल, नाज अहमद मुजावर, मिलिंद पाटील, मयूर हिम्मत पाटील, बुधागिर गोसावी, भटाराम पाटील, ग.भा. सुमनबाई पाटील, ग.भा. पदमाबाई सैंदाणे, मनीषा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील आदी हजर होते. या निवडीबद्दल गणेश पाटील, सखाराम पाटील, सुरेश पाटील, पुंडलिक पाटील, भानुदास पाटील, मुकुंदा पाटील, महेश विसपुते, यशवंत पाटील, लटकन पाटील, गुलाब पाटील, संजय पाटील, उत्तम पाटील, संजय पाटील, गुलाब पाटील, संजय पाटील, ओमगिर गोसावी, भगवान पाटील, किशोर पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील राहुल पाटील, अरुण सैदाने, अजित शह, अजीम मुजावर, पोलिस पाटील गोकुळ पाटील, सुभाष पाटील, सौगंध भिल, रोहिदास सैंदाणे यांच्यासह धार ग्रामस्थांनी अभिनंदन केले.




