
अमळनेर-येथील नगरपरिषदेला वारंवार निवेदन देऊनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाट्यमंदिरावरील महाराजांच्या नावाची दुरुस्ती केली जात नसल्याने असंख्य शिवप्रेमींनी पालिकेत मोर्चा नेऊन मुख्याधिकारीना निवेदन दिले.

गेल्या अनेक महिन्यांपासून नाट्य मंदिरावरील टाकलेले नाव नादुरुस्त असताना याची दखल घेतली जात नसल्याने शिव भक्तांनी नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर हे काम करण्यात यावे अशी विनंती निवेदन देऊन केली.
यावेळी अमर पाटील, सागर पाटील, शुभम पाटील, मनोज शिंगाणे, सुदीप पाटील, गोपाल पाटील, आबीत पठाण भूषण लोहार ,दुर्गेश पाटील, बंटी पाटील, भटू पाटील, जगन पाटील, भटू पाटील, चेतन पवार, सागर सुतार उपस्थित होते.
दरम्यान सदर दुरुस्ती चे काम 7 डिसेंबर रोजी सुरू करून दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल असे लेखी पत्र पालिकेच्या वतीने आंदोलन कर्त्यांना देण्यात आले.




