अमळनेर:- महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतल्याबद्दल व दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्याबद्दल केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र घोषणा देत अमळनेर शहर भाजपाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष विजय राजपूत, माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, हरचंद लांडगे, अजय केले, महेश पाटील, गोकुळ पाटील, रमेश देव, उपाध्यक्ष दीपक पाटील, गोकुळ पाटील, सदाशिव पाटील, रमाकांत माळी, महावीर मोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष देविदास लांडगे, सरचिटणीस समाधान नाना पाटील, शिवकिरण बोरसे, सौरभ पाटील, कमलेश वानखेडे, प्रसाद भामरे, भावेश जैन, देवा भोई, गौरव सोनार हर्षल शिंपी, दीपक बोरसे आदी उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात आतिश बाजी करत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला.