
अमळनेर : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांच्या निधीतून अमळनेर तालुक्यातील १५ शाळांना पोडीयम आणि संगणक देण्यात आले.

तालुक्यातील लोण ग्रुप माध्यमिक विद्यालय , कै भालेराव रामभाऊ पाटील ज्युनिअर कॉलेज मारवड ,सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे , सावखेडा येथील किसन दाजी हायस्कूल , एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे , योगेश्वर माध्यमिक विद्यालय डांगर , इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय , के डी गायकवाड हायस्कूल , माध्यमिक विद्यालय नगाव, जि प प्राथमिक शाळा हेडावे , माध्यमिक विद्यालय टाकरखेडा , जि प शाळा आमोदे , सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, खुशालबापू आश्रमशाळा गडखाम्ब या शाळांना आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतुन संगणक आणि पोडियम असे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एन पाटील होते.
यावेळी माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे , टी डी एफ अध्यक्ष सुशील भदाणे , एजाज शेख यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एम एस सुपेकर , गुंजाळ सर , सोहल शेख , प्राचार्य एम जे शेख प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. कार्यक्रमास संजय पाटील ,निलेश विसपुते , मंनोज पाटील ,एस व्ही पाटील , मुख्याध्यापक ठाकूर ,हर्षल पाटील , हर्षल सोनवणे ,दीपक पवार ,विलास चौधरी हजर होते. सूत्रसंचालन डी ए धनगर तर आभार मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी मानले.




