
अमळनेर : अमळनेर धरणगाव रेल्वे रुळावर एका ५५ वर्षीय इसमाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केली आहे.

मयत इसम हा शरीराने मजबुत व उंच असून त्याने अंगात लाईनिंग चा चौकटीच्या शर्ट घातला होता. तर निळ्या रंगाचे सूट पॅन्ट ,काळा निकर , पांढऱ्या रंगाचा बनियन घातला होता. १२ रोजी सायंकाळी साडे चार वाजता खांब क्रमांक २५५ जवळ घडली. कोणाला ओळख पटल्यास पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.




