
शहरात पोस्ट ऑफिस मध्ये एकमेव केंद्र असल्याने नागरिकांचे होताहेत हाल
अमळनेर -शहरात आधार कार्ड दुरुस्तीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये एकमेव केंद्र असल्याने दररोज याठिकाणी नागरिकांच्या रांगा लागत असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

विशेष म्हणजे नागरिक पहाटे 4 वाजेपासून याठिकाणी रांगा लावत असून तासनतास ताटकळत उभे राहत आहेत,यात विशेष करून ज्येष्ठ नागरिकांचे खूपच हाल होत आहेत.शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असून अनेकांच्या आधार कार्ड मध्ये नाव,जन्म तारीख अथवा इतर चुका असल्यास योजनेचा लाभ घेताना अडचणी येतात यासाठी दुरुस्ती करायची असल्यास एकमेव पोस्ट ऑफिस मध्ये सुविधा देण्यात आली आहे.याठिकाणी एकच कर्मचारी असल्याने एका दिवसात सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत जास्तीतजास्त 30 जणांची दुरुस्ती होत असते इतरांना रांगेत असेल तरीही परतावे लागते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळासून रांगेत उभे राहावे लागत असते.यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले असून शहरात लोकप्रतनिधीं व अधिकारी वर्गाने लक्ष घालून आधार दुरुस्तीसाठी केंद्र वाढवावे अशी मागणी होत आहे.




