अमळनेर:- श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्ट तर्फे श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् निंब,ता अमळनेर येथे श्री दत्त जयंती उत्सव आज दिनांक 14 रोजी शनिवारी साजरा होणार आहे.
श्री दत्त याग व वर्धमान व्रताधिराज उपासना 14 डिसेंबर पासून 12 जानेवारी पर्यंत आहे.आज सकाळी 8 वाजता श्री दत्त कैवल्य याग आरंभ,सकाळी 9.30 वाजता श्री दत्तात्रेय उदी कुंभ पालखी सोहळा,सकाळी 11 वाजता श्री दत्तात्रेय उदी कुंभाचे स्थापने पूर्वी सर्वांना दर्शन नंतर स्थापना व श्री दत्त जयंती पूजन सुरवात ,दुपारी 12 वाजता..
महाआरती,दुपारी 3 वाजता घोरकष्टउद्धरण स्तोत्र पठण,
दुपारी 4 वाजता श्री दत्त स्तव स्तोत्र पठण,दुपारी 12.30 वाजे पासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत दर्शन व सायंकाळी 6 वाजता सांगता समारंभ होणार आहे. सर्वानी यावे आणि भक्ति भाव चैतन्यात चिंब भिजावे असे आवाहन श्री अनिरुद्ध बापू भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.