
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा २०२४ मध्ये पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथील सहभागी दोन्ही संघ विजयी झाले असून त्यांची विद्यापीठ स्तरीय सादरीकरणासाठी निवड झाली आहे.

संघ क्रमांक एक कोड – ५४ सारंग पाटील आणि सचिन मैराळे तर संघ क्रमांक दोन कोड – ६० सागर कोळी व चैताली पाटील आदी विजयी झाले आहेत. तर टीम लीडर आणि मेंटॉर म्हणून प्रा.डाॅ. भरत खंडागळे यांनी काम पाहिले संस्थेचे चेअरमन अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ. पी.एस.पाटील, आयक्युएसी समन्वयक प्रा. विजयकुमार वाघमारे व सर्व प्राध्यापकांनी या यशाबद्दल सर्व टिमचे अभिनंदन केले व पूढील सादरीकरणासाठी शूभेच्छा दिल्या.




