
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे-भोरटेक दरम्यान असलेले रेल्वे क्रॉसींग गेट क्र. १३१ हे दुरुस्ती करीता दि.१६/१२/२०२४ रोजी सकाळी ०७ वाजे पासुन ते दि.३०/१२/२०२४ रोजी सायंकाळी ०७ वाजे पर्यंत बंद ठेवण्यात येवुन त्या वरील वाहतुक ही भरवस- बेटावद मार्गे वळविण्या बाबत विनंती केली आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्यात याव्यात अशा सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनधारकांनी भरवस बेटावद मार्गे वापर करावा असे आवाहन पोलीसांनी
केले आहे.





