अमळनेर : रिक्षाचालक फोन वर बोलताना रिक्षा रस्त्याखाली उतरून पलटी झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना १४ रोजी सायंकाळी अमळनेर पारोळा रस्त्यावर खोकरपाट फाट्याजवळ घडली.
एम एच १९ ए एक्स ९२१८ क्रमांकाची पॅजो रिक्षा पारोळ्याहून अमळनेर येत असताना खोकरपाट फाट्यावर रिक्षाचालक फोनवर बोलत होता. त्याचे दुर्लक्ष झाल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उतरत असताना पुढच्या चाकाला दगड आडवा आल्याने रिक्षा पलटी झाली. त्यात बसलेला निवृत्ती कैलास जाधव (वय २८ रा बाबू गॅरेजजवळ) हा जागीच ठार झाला. तर पिळोदा येथील दोन जण जखमी झाले. निवृत्ती याचे शव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनसाठी तर जखमींना उपचारासाठी आणण्यात आले.