
व्याख्यानमाला, गुणवंताचा सत्कार, नेत्रबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन…
अमळनेर:-: तालुक्यातील मारवड येथील विठ्ठल मंदिर संस्थान व सार्वजनिक वाचनालय आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हभप मोठेबाबा व कपिलेश्वर मंदिराचे मठाधीपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाने सालाबादप्रमाणे यावर्षी ही रविवारी दिनांक 15 डिसेंबरच्या दत्त जयंतीपासून दिनांक 22 डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे 67 व्या वर्षीही आयोजन करण्यात आले आहे, यात ज्ञानदानासह तीन दिवसीय व्याख्यान माला व नेत्रबिंदू तपासणी व शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

कार्यक्रमाची सुरुवात गावातील विठ्ठल रुक्मिणी व गणपती मंदिरापासून धर्मग्रंथ देवांच्या पादुका व प्रतिमेचे भव्यदिव्य अशी शोभायात्राने कीर्तन सप्ताहाची सुरुवात होईल. प्रभू दत्त भगवान जयंती निमित्त पांच नद्याच्या पाण्याने पंच्यामृत अभिषेक होईल, धुनी व गोमूत्र शिंपडून कथा मंडप शुद्धीकरण करून प्रांतकाळी सामूहिक आरतीने प्रारंभ होईल त्यात दैनदिंन कार्यक्रमात पहाटे 5:30 ते 6:30 यावेळी काकडा व प्रार्थनेने आरतीने होईल, सकाळी 7 ते 8 रामधून दुपारी 4 ते 5 प्रवचन व कथा निरूपण होईल , सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, भारुड व रात्री 8 ते 10 यावेळी जाहीर हरीकीर्तन होईल असे दैनंदिन आठ दिवस नित्य कार्यक्रम होतील. त्यासाठी आळंदी येथिल नामवंत कीर्तनकार कीर्तनरूपी सेवा देणार आहेत ते पुढील प्रमाणे रविवार 15 डिसेंबर रोजी ह.भ.प विवेक महाराज वेलेकर यांचे कीर्तन झाले,सोमवार 16 डिसेंबर रोजी ह.भ.प गजानन महाराज देवाची आळंदि, मंगळवार 17 डिसेंबर रोजी ह.भ.प रामचंद्र महाराज मालपूरकर, बुधवार 18 डिसेंबर रोजी ह.भ.प पोपट महाराज कासारखेडेकर , गुरूवार 19 डिसेंबर रोजी ह.भ.प. मुकुंदा महाराज ढेकूकर , शुक्रवार 20 डिसेंबर रोजी ह.भ.प. किशोर महाराज सोनखेडीकर शनिवार 21 डिसेंबर रोजी दुपारी विठ्ठल रुक्मिणी मुर्त्या व दत्त भगवानच्या पादुका, गीता -भागवत ग्रंथ, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेच्या सजविलेल्या पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात येईल व रात्री
ह भ.प बाजीराव महाराज देवाची आळंदि यांचे कीर्तन होईल तर रविवार 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 :30 ते 10:30 यावेळी ह.भ.प. बाजीराव नाना महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होऊन लाही काला महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता होईल तरी पंचक्रोशीतील समस्थ भाविक भक्तांनी उपस्थित राहून ज्ञानदानाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त विठ्ठल मंदिर संस्थान , दत्त भगवान समूह व मारवड ग्रामस्थ यांनी केली आहे.




