
अमळनेर : बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात याव्यात. सर्व शासकीय यंत्रणांनी विवाहाशी संबंधित सर्व घटकांच्या संपर्कात राहून प्रतिबंधक कायद्याची जनजागृती करून बालविवाह रोखले पाहिजेत असे आवाहन उपविभागीय नितीनकुमार मुंडावरे यांनी केले.

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात अमळनेर व चोपडा विभागाच्या महसूल अधिकारी , आरोग्य विभाग , पोलीस अधिकारी , पंचायत समिती व नगरपरिषद अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवली होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी संगीतले की गावातील आशा स्वयंसेविका , अंगणवाडी सेविका , पोलीस पाटील ,तलाठी यांनी लग्न होत असलेल्या मंगल कार्यालय , मंदिर ,शाळा आदी ठिकाणचे मालक , भटजी , व इतर संबंधित व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांना कायद्याची जाणीव करून बालविवाह होऊ न देता पोलिसांना कळवण्याचे आवाहन करा. पोलिसानी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी. दवाखान्यात येणारी गर्भवती महिलांच्या बाबतीत सखोल चौकशी करून त्यांच्या वयाची खात्री करा. अल्पवयीन असल्यास त्याची माहिती तातडीने कळवावी जेणेकरून लगेचच दखल घेता येईल असेही आवाहन केले.
या बैठकीस अमळनेर व चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आबासाहेब घोलप , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात , गटविकास अधिकारी एन आर पाटील ,तालुका वैद्यकीय अधिकारी एन आर पाटील , मुख्याधिकारी तुषार नेरकर , चोपडा शहर पोलीस निरीक्षक एम डी साळवे , चोपडा ग्रामीण पो नि के एम करमरकर , एपीआय जीभाऊ पाटील ,एपीआय पी टी वाघ , बालविकास प्रकल्प अधिकारी जयमाला शिरसाठ , माधवी चौधरी , योगिता चौधरी , मोहिनी धनगर , आनन्द पगारे ,किशोर वानखेडे , प्रदीप लासुरकर , के बी सुर्वे ,आर एल पाटील,एस एम वळवी हजर होते.




