भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याने प्रांतांना निवेदन
अमळनेर -परभणी येथील घटनेचा अमळनेर येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर निषेध करून भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याने अमळनेर प्रांतधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यात म्हंटले आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या अथक परिश्रमाने देशाचे संविधान लिहले. राज्य घटनेत सर्व जाती धर्माना समान न्याय दिला म्हणून देशात एकात्मता अबाधित आहे. असे असताना दि. 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे सोपान दत्तराव पवार या माथेफिरूने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड व विटंबना केली आहे. संविधानावर भारत देश चालतो आणि अश्या संविधानाची महाराष्ट्रात विटंबना होणे म्हणजे एक शोकांतिका आहे. यामुळे जातीयवादी विकृती अज्ञान मानसिकता पुढे आलेली आहे. सामाजिक एकोपास हानिकारक आहे. तसेच परभणी येथील आंबेडकरी वस्त्यामध्ये कोम्बोग ऑपरेशन मध्ये निर्दोश तरुणांना उचलुन खोटे गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली.त्यामध्ये LL.B चा विद्यार्थी परिक्षेसाठी आलेला सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यास पोलिसांनी कोबीग कारवाईत निर्दयपणे मारहाण करून त्यास आरोपी बनविले. तसेच क्रूरपणे कोबींगमध्ये पोलिसांनी सर्वांना मारहाण केलो. पहिल्या दिवशी प्रचंड मारहाण झालेल्यांना पोलिसांनी मेडिकलसाठी दवाखान्यात घेऊन गेले नाहीत. उलट डॉक्टरांना पोलीस ठाण्यात बोलावून त्या सर्वांचे मेडीकल केले. पोलिसांनी दहशत निर्माण करून आंबेडकरी वस्त्यात दोन दिवस हैदोस घातला. त्यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी हया तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतला. लॉ चा विद्यार्थी असणारा हा तरुण न्यायालयीन कोठडीत असतांना मरण पावतो ही एक गंभिर बाब आहे. सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर आमचा तसूभर विश्वास राहिलेला नाही. त्यासाठी तातडीने न्यायालयीन चौकशी करण्यात येवून पोलीस निरिक्षक अशोक घोरांड सह पोलिसातील गुंडयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व निर्दोष लोकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यात दिला आहे.सदर निवेदन देताना भीमराव वानखेडे,पंकज वानखेडे,सचिन अहिरे,महेंद्र बैसाने,मुकेश मैराले,गुलाब कोळी,बापू भामरे,दीपक सैदाने,मंगला सोनवणे, माया सैदाने,पोपट निकम,दिनेश सोनवणे, बायजा बाई भिल उपस्थित होते.