कारवाईसाठी गांधलीपुरा भागातील नागरिकांचे निवेदन,अन्यथा उपोषणाचा इशारा
अमळनेर:- उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही अमळनेर शहरात खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत तात्काळ कारवाई करणे बाबत अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडेवांर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे उपस्थित होते. गांधलीपुरा दर्गा अली मोहल्ला परिसरातील नागरिकांनी हे निवेदन दिले.यात म्हंटले आहे की अमळनेर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मागील भागात वेश्याव्यवसाय बाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, सदरील याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर नुकतेच उच्च न्यायालयाने बंद चे आदेश दिले सदरील आदेशा चा प्रती अमळनेर पोलिस स्टेशन व उच्च स्तरीय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत,मात्र सदरील कुंटणखाने वेश्याव्यवसाय खुलेपणाने सुरू आहेत, कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.सदरील गैर कानूनी कुंटणखाने वेश्याव्यवसाय करणारेवर १५ दिवसात कोणतेही प्रकारे कारवाई दिसून आली नाही.
सदर कुंटणखःन्यामुळे आजुबाजुच्या रहिवाशी परिसरातील महिलां व कॉलेज च्या विद्यार्थ्यांनीना रस्त्याने चालने देखील अवघड झाले आहे. सदर प्रकारामुळे चांगल्या घरातील महिलांना देखील तेथील लोक त्या नजरेने बघतात, छेडछाड करतात तरी आपण सदर प्रकारावर तात्काळ न केल्यास दि.२६ जानेवारी २०२५ रोजी नाईलाजास्त्व आपल्या कार्यालयातील पटांगणात संविधानिक पध्दतीने उपोषणास बसावे लागेल व होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यात देण्यात आला आहे.निवेदनावर अनेकांच्या सह्या आहेत.