अमळनेर:- अमळनेर २४×७ दिनदर्शिका सन २०२४ चे प्रकाशन माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर २४×७ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, संपादक डॉ. विलास वसंतराव पाटील, मनोहर साळुंखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.