
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील एम.एस.ई.बी च्या सोलर प्लांट वरून १ लाख २० हजार रुपयांचे केबल वायर चे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वावडे येथे एम एस के व्ही वाय १३ सोलर एसपीव्ही लि.एम एस.ई.बी सोलर प्लांट चे काम सुरू आहे.कुशाना विकास हे या प्लांट वर सिनियर इंजिनियर म्हणून कामकाज पहात असून त्यांच्याकडे अमळनेर व पारोळा युनिट चे कामकाज पहात असतात.या साईट वर कंपनीकडून ३ सुरक्षा गार्ड नेमलेले आहेत.
२२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरक्षा रक्षक यांनी इंजिनियर यांना फोन करून सांगितले की, प्लांट वरील सोलर केबल जागेवर दिसत नाही.त्यावेळी इंजिनियर यांनी जागेवर जाऊन पाहिले असता ९० हजार रुपये किमतीची ६ की.मी.लांबीची सोलर केबल तसेच ३० हजार रुपये किंमतीची १ की.मी.लांबीचे केबल चे २ बंडल असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञातांनी चोरीला नेल्याचे समजले.
सिनियर इंजिनियर यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास विनोद साळी करीत आहेत.




