
अमळनेर -आर्ट ऑफ लिव्हिंग हॅप्पीनेस प्रोग्राम चे आयोजन दिनांक 1 ते 6 जानेवारी 2025 दरम्यान अमळनेर शहरात आयोजित करण्यात आले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन वर्षात आनंदाचा अनुभव घेण्यासाठी हे खास शिबिर आयोजित करण्यात आले असून यात “सुदर्शन क्रिया” तसेच योग,प्राणायाम,ध्यान व अमूल्यज्ञान,शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढ, शांत व तणावमुक्त मन,सकारात्मक दृष्टिकोन,प्रभावी निर्णयक्षमता, मानसिक स्वास्थ्य आदी फायदा होणार आहे.यावेळी अनुभवी प्रशिक्षक बी एन पाटील व प्रा. पी बी भराटे हे प्रशिक्षण देणार आहेत.दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत ॲड. पदमीणी भावसार यांच्या घरी ” रामाई ” आनंद कॉलनी जिवनतारा हॉस्पिटल मागे, अंमळनेर येथे हे शिबिर होणार आहे. रजिस्टर साठी लिंक http://aolt.in/837857 तर अधिक माहितीसाठी प्रा. पी. बी. भराटे 9423934797, बी एन पाटील 7588687631, डॉ. अदित्य माहेश्वरी 7666603643 यांचेशी संपर्क साधावा.




