
अमळनेर : नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २१ ते २३ दरम्यान तालुक्यातील मांजर्डी येथे घडली.

सुकलाल भीमराव बिऱ्हाडे हे २१ रोजी सकाळी साडे दहा वाजता घराला कुलूप लावून नातेवाईकाच्या लग्नाला दोंडाईचा येथे गेले होते. २३ रोजी सायंकाळी सहा वाजता घरी परत आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील किचन मधील धान्याच्या कोठीतील ४० हजार रुपये रोख आणि ३ ग्रॅम सोन्याचे कर्णफुले, २ ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र दिसून आले नाही. सुकलाल बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.




